पुणे पुण्याबद्दल काय लिहावं, "पुणे तिथं काय उणे" हे अगदी खरं आहे, अशी कोणतीही गोष्ट नाही जी पुणे मधे उपलब्ध नाही, पाहण्यासाठी सुप्रसिध्द ठिकाणे, आणि पुणे हे विद्याचे माहेर घर अस बोललं जातं. पिशव्यांची आठवण, "शनिवारवाडा" शनिवारवाडा ही पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असून, इ.स.१८ व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, आर्थात पेशवे यांचे निवास्थान होते. त्यानंतर पुण्यातील सुप्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, आणि सर्वात मानाचा गणपती. पुण्यामध्ये महिला साठी सर्वात प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, एका छोट्याश्या कानातल्या पासून ते पायातील बूट पर्यंत सर्वच गोष्टी पुण्यातील तुळशीबागेत पाहायला भेटतील. छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीतील सिंहगड हा किल्ला पुण्यामधेच आपल्याला पाहायला भेटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू व शुर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले, तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूची बातमी ऐकून, छत्रपती शिवाजी महाराज मानले,"गड आला पण सिंह गेला" त्यावर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले. पुण्यातील सुप्रसिध्द बाग...
This is very corrageous for me.. .Good
ReplyDelete