आयुष्य गंभीर होऊन जगू नका

आयुष्य गंभीर होऊन जगू नका

जीवनात तसेच करीयर मधे केवळ शैक्षणिक किंवा करीयरविषयक ध्येय उराशी बाळगू नका, सारे जीवन सुंदर, समतोल व्यतीत करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष व ध्येय निश्चित करा. म्हणजेच, तुमचे आरोग्य, नाते संबंध, मानसिक सास्थ सारे सारे उत्तम राहील आशा दृष्टीने जीवन बांधणी करा. तसेच बनण्याचा प्रयत्न करा. तरच आयुष्याला खरा अर्थ असे मी मनेल. ज्या दिवशी तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे, त्याच दिवशी तुमचा घटस्फोट झाला तर काय उपयोग.... तुम्ही आलिशान मोटारचे ड्रायव्हिंग करत असताना तुमची पाठ दुखत असेल तर ड्रायव्हिंग ची काय मजा येणार.....
तुम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये गेले असातना मनांत खूप तणाव असेल तर त्याचा तुम्हाला काहीच आनंद उपभोगता येणार नाही. आयुष्य फार गंभीरतेने घेऊ नका.

जीवन हे गंभीरपणे जगण्यासाठी मुळीच नाही मुळातच आपण या भूतलावर कायम राहण्यासाठी आलेलो नाही. येथे तुमचे आस्थित्व काही काळासाठीच आहे, याचे सतत भान ठेवा मोबाईल फोनमधील प्रीपेड कार्ड सारखीच आपली validity येथे कायमसवरूपी नाही. आपण जर खरेच नशिबवन असलो, जर अजुन आपण ५० वर्षे जगू आणि खर बघायला गेलं तर ५० वर्ष म्हणजे २५०० रविवार! खरच आपण इतकं काम करण्याची मुळीच गरज आहे का? हा प्रश्न मानला सतत विचारा. महाविदयालया मध्ये शिकत असाल तर कधीतरी क्लास ला आरामात दांडी मरा. काही पेपर मध्ये मार्क्स कमी पडले तर हरकत नाही एखाद्या रोबो प्रमाणे यंत्रवत काम करू नका. आयुष सहजतेने जगा. आनंदाने जगा, त्याची मजा लुटा, आपल्या आजू बाजूच्या लोकांना, कुटुंबं यांना आनंद द्या.

Comments

Popular posts from this blog

Time

जीवनाचा प्रवास