जीवनाचा प्रवास

आपण गावाला जायचे तर काय काय तयारी करतो, सहज पाहिला गेलं, तर आपण बॅग भरतो, सर्व दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या गोष्टी आपण घेत असतो, आणि मगच आपण बाहेर पडतो, आपण निघतो गावी जायला, बस मधे बसल्यावर आपल्याला जिकड जायचं तिकडचं तिकिट तर नक्कीच काढतो, आपण अस तर नाही मनत कंडक्टर ला, कुठं पण सोडा, पाहिजे तिथं, जिकडं बस जाईल तिकड, म्हणजे आपल नियोजन असत, कुठं जायचं आहे? सामानाची तयारी असते. अगदी तसच आपल्या जीवनाचं देखील आहे, आपल्या जीवनाचा प्रवास तर चालू आहे, पण आपल्याला माहीतच नाही कुठं जायचं आहे? आपल्याकडे तिकीटच नाही, नक्की आपल्यालाच माहीत नाही की आपण कुठं चाललोय, तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल, आपला प्रवास कुठं जात आहे? आणि आपल्याला तो कुठ घेऊन जायचा आहे.. प्रत्येक सामान्य माणसाचे काही ना काही, छोटी मोठी स्वप्न असतात, तर ते पूर्ण करण्यासाठी माणूस नेहमी धडपड करत असतो, आपली काहीही स्वप्न आसो, ते कुठं तरी लिहून काढा, मग ते कोणते ही अासो, छोटे मोठे काहीच हरकत नाही पण लिहून काढा, त्याने होईल अस की ते आपल्या डोळ्या समोर राहील, आपली वाटचाल होईल पुढं..... पण आपल्या कडे आपल्या जीवनाचं तिकिट हवं त्याशिवाय आपण जीवनाचा प्रवास पूर्ण नाही करू शकत...!!

Comments

Popular posts from this blog

Time